Sangamner: संगमनेर तालुक्यात आणखी १४ रुग्णांची वाढ
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात शनिवारी सायंकाळी १४ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत त्यामुळे तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची १६५६ संख्या पोहोचली आहे.
या बाधित रुग्णांमध्ये संगमनेर शहरातील नवीन नगर रोड येथे ६५ वर्षीय पुरुषाला करोनाची लागण झाली आहे. तर तालुक्यातील कौठे कमलेश्वर येथे २३ वर्षीय महिला, कुरकुटवाडी येथे ३८ वर्षीय महिला, बोटा येथे ३४ वर्षीय महिला, ११ वर्षीय मुलगा, सामानापूर येथे ६२ वर्षीय पुरुष, जोर्वे येथे ५९ वर्षीय पुरुष, चिंचोली गुरव येथे २५ वर्षीय तरुण, चिकणी येथे ७० वर्षीय वृध्द व ६८ वर्षीय महिला, गोल्डन सिटी येथील ४० वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे ७० वर्षीय जेष्ठ नागरिक, पिंपळगाव कोन्झिरा येथे ३६ वर्षीय तरुण, साकुर येथे ४७ वर्षीय महिला अशा १४ जणांना करोनाची लागण झाली आहे. एकूण रुग्णसंख्या १६५६ इतकी झाली आहे.
Web Title: Sangamner taluka 14 corona patient increased