Nivedita Saraf: अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण

मुंबई: अग्गबाई सासूबाई या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांना करोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. त्यांना करोनाची सौम्य लक्षणे असून त्यांनी स्वतःला घरीच विलगीकरण केल्याचे समजते.
या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारे आशुतोष पत्की, तेजश्री प्रधान, गिरीश ओक व इतर कलाकार यांची करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.
या अगोदर आई माझी काळूबाई या सेटवर करोनाचे संक्रमण झाले होते. यात तब्बल २२ जणांना करोनाची लागण झाली होती. यात जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना करोनाची लागण झाली होती. त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. सिनेमा सृष्टीत मोठ मोठ्या कलाकारांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे चित्रीकरणावर बंदी घातली पाहिजे या मागणीसाठी अभिनेते भालचंद्र कुलकर्णी चित्रपट महामंडळाला पत्र लिहिणार आहेत.
See: Latest Entertainment News, Latest Marathi News, and Latest Marathi News Live
Web Title: Actress Nivedita Saraf infected corona

















































