Home क्राईम खळबळजनक! ६ वर्षाच्या चिमुकलीची लैंगिक अत्याचार करून हत्या

खळबळजनक! ६ वर्षाच्या चिमुकलीची लैंगिक अत्याचार करून हत्या

Breaking News | Murder:  सहा वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचे व मृतदेह झुडुपात फेकून दिल्याचा प्रकार.

A 6-year-old girl was sexually assaulted and killed

नांदेड: एका सहा वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचे व मृतदेह झुडुपात फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. नांदेड जिल्ह्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे.  मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,मुदखेडमधील एका गावातील सहा वर्षाची चिमुकली रविवार (१४ जानेवारी)  दुपारपासून घरातून बेपत्ता झाली होती. मुलगी सायंकाळपर्यंत घरी न आल्याने कूटूंबीयांना परिसरात शोधाशोध सुरू केली. मात्र तिचा काहीच पत्ता लागला नाही. त्यानंतर तिच्या पालकांनी मुदखेड पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. रात्रभर शोधूनही मुलगी सापडली नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी चिमुकलीचा मृतदेह मुदखेड ऊमरी रस्त्याशेजारी एका झुडुपात आढळला. बेपत्ता मुलगी मृतावस्थेत आढळल्याने कुटूंबाला मोठा धक्का बसला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

चिमुकलीचा मृतदेह गावापासून जवळपास १२ किमी दूर एका झुडुपात आढळला. मुलीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून संशयित आरोपींकडे चौकशी केली जात आहे.

ही घटना अतिशय चीड निर्माण करणारी असून पोलीसांनी तात्काळ आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेने संताप व्यक्त होत आहे. 

Web Title: A 6-year-old girl was sexually assaulted and killed

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here