Home महाराष्ट्र अनधिकृत वस्तीगृहात राहणाऱ्या तीन विद्यार्थिनींवर अत्याचार, राज्यात चाललंय काय?

अनधिकृत वस्तीगृहात राहणाऱ्या तीन विद्यार्थिनींवर अत्याचार, राज्यात चाललंय काय?

Breaking News | Ratnagiri Crime: एका अनधिकृत वस्तीगृहात राहणाऱ्या तीन विद्यार्थिनींवर संस्थेच्या अध्यक्षांनीच अत्याचार केल्याचे समोर.

Abuse of three female students living in an unauthorized hostel

रत्नागिरी:  राज्यात अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहेत. अशातच संगमेश्वर तालुक्यातील एका अनधिकृत वस्तीगृहात राहणाऱ्या तीन विद्यार्थिनींवर संस्थेच्या अध्यक्षांनीच अत्याचार केल्याचे समोर आले आहे. संस्थेच्या ग्रंथपाल महिलेने दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी संस्था अध्यक्ष नयन मुळये (वय 67) त्यांचा मुलग प्रथमेश मुळये (वय 36 ) शाळेचे मुख्याध्यापक संजय मुळये यांच्याविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 67 वर्षीय संस्था चालकावर अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

शाळेच्या ग्रंथपाल महिलेने रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार संगमेश्वर तालुक्यातील मुलींचे वसतिगृह अनधिकृतपणे चालवले जाते. गणेश उत्सवा दरम्यान शाळेला सुट्टी असल्याने वसतिगृहात राहणाऱ्या एकूण 23 मुलींपैकी 20 मुली गणेशोत्सवासाठी आपल्या गावी गेल्या होत्या. तर यातील तीन मुली सुरुवातीचे काही दिवस तक्रारदार यांच्या घरी राहायला आल्या होत्या. मात्र तक्रारदार या कामानिमित्त पुणे येथे जाणार असल्याने तिन्ही मुलींनी संस्थाचालक नयन मुळये त्यांच्याकडे राहण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गणेशोत्सव संपेपर्यंत त्या मुली त्यांच्याकडेच राहत होत्या. या कालावधीत नयन मुळे यांच्या राहत्या घरी मुलींचा विनयभंग करण्यात आला. ही गोष्ट सुट्टी संपल्यानंतर मुलींनी ग्रंथपालांना सांगितली. त्यानुसार त्यांनी तक्रार दाखल केल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोस्को अंतर्गत संस्था अध्यक्ष नयन मुळये (वय ६७) त्यांचा मुलग प्रथमेश मुळये (वय ३६) शाळेचे मुख्याध्यापक संजय मुळये यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित घटना गणेशोत्सवाच्या काळात घडली असून तीन पैकी एक मुलगी महाविद्यालयात व अन्य दोन मुली शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. पोलिसांनी तिन्ही मुलींची वैद्यकीय तपासणी केली असून त्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे.

या घटनेची सत्यता पडताळणी करून उचित कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या गुन्ह्याचा पुढील तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.

Web Title: Abuse of three female students living in an unauthorized hostel

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here