Home Accident News चालकाचा ताबा सुटल्याने बस उलटून भीषण अपघात

चालकाचा ताबा सुटल्याने बस उलटून भीषण अपघात

Bus Accident: चालकाचा बस वरील नियंत्रण सुटल्याने बस उलटल्याची घटना आंबडवे ते लोणंद या राष्ट्रीय महामार्गावर घडली.

Accident bus overturned due to the driver losing control

रत्नागिरी | मंडणगड : बसचे अपघाताचे सत्र सुरूच आहे. चालकाचा नियंत्रण सुटल्याने एसटी बस उलटल्याने वाहकासह काही प्रवाशी जखमी झाले. आंबडवे ते लोणंद या राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात झाला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज मंगळवारी सकाळी हा अपघात झाला.

आंबडवे ते लोणंद या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. दरम्यान, आंबडवे होऊन नालासोपाराकडे जाणाऱ्या एसटी बस चालकाचा ताबा सुटल्यामुळे गाडी रस्त्यालगत उलटली. बसमध्ये दहा ते बारा प्रवासी होते. सुदैवाने अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. वाहकासह काही प्रवाशांना किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना मंडणगड ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. अपघाताची माहिती कळताच एसटी प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते.

Web Title: Accident bus overturned due to the driver losing control

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here