Home Accident News हार्वेस्टरखाली चिरडून शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू

हार्वेस्टरखाली चिरडून शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू

Ahmednagar News: स्वतःच्या शेतात गहू करण्यासाठी जात असताना हार्वेस्टरचे ब्रेक फेल झाल्याने व ऑपरेटरचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात (Accident) मांडवगण (ता. श्रीगोंदा) येथील शेतकऱ्याचा जागीच मृत्यू. 

Accident death of farmer crushed under harvester

श्रीगोंदा: हार्वेस्टरमध्ये बसून स्वतःच्या शेतात गहू करण्यासाठी जात असताना हार्वेस्टरचे ब्रेक फेल झाल्याने व ऑपरेटरचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात मांडवगण (ता. श्रीगोंदा) येथील शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

बबन शंकर बोरुडे (वय ७०) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.सध्या अवकाळी पावसाचे वातावरण असल्याने शेतातील गहू करण्यासाठी बबन शंकर बोरुडे हार्वेस्टरच्या शोधात होते. त्यांना एक हार्वेस्टर मिळाले. हार्वेस्टर घेऊन थाप्याचा खंडोबा शिवारातील शेताकडे ते चालले होते. त्या हार्वेस्टरमध्ये ते बसले होते. तिकडे जात असताना राळेगण म्हसोबा हद्दीतील सखूबाई मंदिरापासून थाप्याच्या खंडोबाकडे वळणाऱ्या हार्वेस्टरचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे हार्वेस्टर राळेगणच्या दिशेने उताराने वेगाने जाऊ लागले. ऑपरेटरने प्रसंगावधान राखून हार्वेस्टर एका बाजूला वळविला. परंतु, हार्वेस्टरमध्ये बसलेले शेतकरी बोरुडे हे खाली पडले व हार्वेस्टरखाली चिरडले गेले. त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: Accident death of farmer crushed under harvester

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here