Home Accident News दुचाकी आणि कारचा भीषण अपघात, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

दुचाकी आणि कारचा भीषण अपघात, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Breaking News | Ahmednagar: दुचाकी आणि मारुती स्विफ्ट यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन दुचाकीचालक गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू.

accident involving two-wheeler and car, two-wheeler died on the spot

श्रीगोंदा: तालुक्यातील काष्टी परिसरात काष्टी दौड रस्त्यावर परीक्रमा कॉलेज समोर शनिवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दुचाकी आणि मारुती स्विफ्ट यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन दुचाकीचालक गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला. दत्तु किसन कोकरे (रा. खराडेवाडी ता. बारामती जि.पुणे) असे दुचाकीचालकाचे नाव आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात निलेश अशोक कोकरे (रा. खराडेवाडी ता. बारामती जि. पुणे) यांच्या फिर्यादीवरून स्विफ्ट चालक नवनाथ दत्ताराव राऊत (रा. शाहनुमियाँ दर्गा, औरंगाबाद) याचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

या बाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार मयत दत्तु किसन कोकरे हे काष्टी दौंड मार्गे बजाज पल्सर दुचाकी (क्र.एम. एच.१४ जीएम ४३१६) वरुन खराडेवाडी बारामतीकडे जात असताना नगर दौंड महामार्गावर काष्टी येथील परीक्रमा कॉलेजसमोर दौंडकडुन भरधाव वेगाने येणाऱ्या स्वीप्ट कार (क्रमांक एमएच ४३ एएन ७६२१) वरील चालक नवनाथ दत्ताराव राऊत याने समोरा समोर जोराची धडक दिली. या भीषण धडकेत कोकरे हे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असताना त्यांचारस्त्यात उपचाराअभावी मृत्यू झाला. स्विफ्ट कार चालक नवनाथ दत्ताराव राऊत याने चारचाकी गाडी हयगयीने तसेच निष्काळजीपणे भरधाव वेगात रस्त्याचे परीस्थितीकडे दुर्लक्ष करुन दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास श्रीगोंदा पोलिस करत आहेत.

Web Title: accident involving two-wheeler and car, two-wheeler died on the spot

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here