Home Accident News भीषण अपघात: नाशिक पोलिसांची गाडी महामार्गावर तीन वेळा उलटली अन…

भीषण अपघात: नाशिक पोलिसांची गाडी महामार्गावर तीन वेळा उलटली अन…

Nashik Accident: मुंबई आग्रा महामार्गावर पोलिसांच्या गाडीचा भीषण अपघात, तीन पलटी, तीन पोलीस कर्मचारी जखमी.

accident Nashik police car overturned three times on the highway

नाशिकः मुंबई – आग्रा महामार्गावर इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील लिअर कंपनीजवळ पोलिसांच्या वाहनाचा अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींना उपचाराकरिता वाडीवऱ्हे येथे दाखल करण्यात आले आहे.

संतोष भगवान सौंदाणे वय ५७, सचिन परमेश्वर सुक्ले वय ४३, रविंद्र नारायन चौधरी वय ३७ अशी जखमी पोलिसांची नावे आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नाशिकहुन मुंबईच्या दिशेने जाताना हा अपघात घडला आहे. यावेळी तीन वाहने एकमेकांवर आदळली असून अपघातानंतर पोलिसांच्या वाहनाने तीन पलट्या खाल्ल्या, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. तर या अपघातातील एक वाहन पसार झाल्याची देखील माहिती दिली आहे. या घटनेत नाशिक शहर पोलिस दलाचे तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांना या अपघाताची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने अपघात स्थळावर धाव घेत जखमींना वाडीवऱ्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. यात पोलिसांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आणखी एका कारचे नुकसान झाले आहे. तर एक वाहन फरार झाले आहे. पोलिसांच्या वाहनाला अपघात झाल्याने घटनास्थळी दाखल झालेल्या नागरिकांकडून तात्काळ मदत कार्य करण्यास सुरुवात झाली.

Web Title: accident Nashik police car overturned three times on the highway

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here