Home Accident News अहमदनगर: मळीच्या टँकरने धडक तरुणाचा जागीच मृत्यू

अहमदनगर: मळीच्या टँकरने धडक तरुणाचा जागीच मृत्यू

Ahmednagar Accident: पान घेण्यासाठी जात असलेल्या तरुणास मळीच्या टँकरने जोरदार धडक दिल्याने अपघाताची घटना, तरुण जागीच ठार.

Accident young man was hit by a fertilizer tanker and died on the spot

श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरातील सय्यद बाबा चौकात पान घेण्यासाठी जात असलेल्या तरुणास मळीच्या टँकरने जोरदार धडक दिल्याने अपघाताची घटना घडली. यामध्ये चितळी येथील तरुण जागीच ठार झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, काल शनिवरी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एमएच 17 एजे 780 या क्रमांकाचा टाटा मांझा या गाडीतून दोघेजण सय्यद बाबा चौकातून जात होते. त्यांनी हॉटेल मिनार जवळ आपली कार उभी केली व त्यातील एक तरूण पान घेण्यासाठी कारमधून खाली उतरला.

त्याचवेळी पाठीमागून आलेल्या एमएच 17 बीवाय 9037 या मळीच्या टँकरने धडक त्याला धडक दिली. त्यात हा तरुण टँकरच्या चाकाखाली सापडल्याने त्याच्या शरिराचा चेंदामेंदा झाला. या अपघातानंतर टँकर चालक थेट तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाला. या अपघातात ठार झालेला तरुण श्रीरामपूर येथील एका पोलिस कर्मचार्‍याचा नातेवाईक होता असे समजते.

रात्री उशिरा पोलिसांनी तेथे येवून पंचनामा करून मृत्यदेह रुग्णालयात नेण्यात आला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Web Title: Accident young man was hit by a fertilizer tanker and died on the spot

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here