संगमनेरात गुटखा विक्रेत्यावर कारवाई, 20 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त
Sangamner Crime: गुटख्याची संगमनेरात सर्रास विक्री करणार्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्याकडून 5 हजार 400 रुपयांचा गुटखा व मोटारसायकल जप्त.
संगमनेर: राज्यात गुटखा बंदी असतांना गुटख्याची संगमनेरात सर्रास विक्री करणार्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्याकडून 5 हजार 400 रुपयांचा गुटखा व मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिलीप सहादू शिंदे (रा. गुंजाळवाडी) हा त्याच्या ताब्यातील मोटारसायकल क्रमांक एम. एच. 15 जी 9567 हिच्याहून गुटखा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दिलीप शिंदे यास देवाचा मळा येथे पकडले. त्याच्याकडून 4320 रुपयांचा हिरापान मसालाची 36 पाकिटे व पिवळ्या रंगाचे रॉयल कंपनीचे सुगंधीत तंबाखू 1080 रुपयांची व मोटारसायकल 20 हजार रुपयांची असा एकूण 20 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल अविनाश बर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दिलीप शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबरस 407/2023 भारतीय दंड संहिता 188, 272, 273, 328, अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 नियमाचे कलम 59, 26 (2),(खत) प्रमाणे दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहे.
Web Titie: Action taken against Gutkha seller in Sangamaner
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App