Home अकोले अगस्ती कारखान्याच्या अध्यक्षपदी गायकर तर उपाध्यक्षपदी या नेत्याची निवड

अगस्ती कारखान्याच्या अध्यक्षपदी गायकर तर उपाध्यक्षपदी या नेत्याची निवड

Agasti factory Election: अगस्ती कारखाना अध्यक्षपदी सीताराम पाटील गायकर तर उपाध्यक्षपदी अशोकराव भांगरे  यांची निवड.

Agasti factory elects Gaikar as chairman and vice-chairman ashokrao Bhangare Election

अकोले: अगस्ती कारखान्याच्या अध्यक्षपदी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ संचालक सिताराम पाटील गायकर यांची तर उपाध्यक्ष पदी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे यांची बिनविरोध निवड झाली.

अगस्ती कारखान्यात २० वर्षानंतर पुन्हा एकदा सत्ताबदल झाला. अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीत आ. डॉ किरण लहामटे व सहकारातील ज्येष्ठ नेते सीताराम पाटील गायकर यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी समृद्धी मंडळाने सर्वच्या सर्व २१ जागांवर दणदणीत विजय मिळविला.

पहिल्यापासूनच अध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ नेते सिताराम पाटील गायकर यांचे नाव निश्चित होते. पण उपाध्यक्ष पदासाठी एकाच वेळी अनेकांनी इच्छा व्यक्त केल्यामुळे हा प्रश्न थेट माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कोर्टात गेला. अखेर त्यांनी सर्व विचार करून उपाध्यक्ष पदी अशोकराव भांगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे.

नवनर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आज नवनिर्वाचित संचालक मंडळाची विशेष बैठक अगस्ती कारखाना येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते.

अध्यक्ष-उपाध्यक्ष या दोन्हीही पदांसाठी प्रत्येकी एकेक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा निबंधक गणेश पुरी यांनी अध्यक्षपदी गायकर व उपाध्यक्ष पदी भांगरे यांची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले.

सहा.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अकोलेचे सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित अध्यक्ष गायकर व उपाध्यक्ष भांगरे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Web Title: Agasti factory election Gaikar as chairman and vice-chairman ashokrao Bhangare

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here