Ahmednagar: जिल्ह्यात वाढले ७४४ रुग्ण तर ६८१ रुग्णांना डिस्चार्ज
अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात काल सायंकाळी सहा वाजेपासून ते आज सायंकाळी ६ वाजे पर्यंत ७४४ करोनाबाधितांची वाढ झाली आहे. तर जिल्ह्यातील ६८१ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.
एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या २७,६७१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.०९ इतके आहे. सध्या ४,७२२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३२ हजार ९०७ इतकी झाली आहे.
आज जिल्हा प्रयोगशाळेत २३९, खासगी प्रयोगशाळेत ३८, अॅटीजेन चाचणीत ४६७ रुग्ण तपासणीत बाधित आढळून आले आहे.
जिल्हा रूग्णालय प्रयोगशाळेत २३९ बाधित यामध्ये मनपा ७६, संगमनेर १८, पाथर्डी ५, नगर ग्रामीण १२, श्रीरामपूर ९, नेवासा ३९, राहुरी १, शेवगाव ४९, कोपरगाव ८, जामखेड ३, कर्जत १, मिलिटरी हॉस्पिटल १८ असे बाधित आढळून आले आहेत.
खासगी प्रयोगशाळेत ३८ यामध्ये मनपा ७, संगमनेर ३, राहता १४, नगर ग्रामीण १, श्रीरामपूर २, कॅन्टोनमेंट २, श्रीगोंदा १, पारनेर ५, अकोले १, राहुरी १, जामखेड १ असे बाधित आहेत.
अॅटीजेन चाचणीत ४६७ रुग्ण यामध्ये मनपा ५०, संगमनेर ४७, राहता ३८, पाथर्डी ३२, नगर ग्रामीण १४, श्रीरामपूर ३५, कॅन्टोनमेंट ६, नेवासा १४, श्रीगोंदा १६, पारनेर ३९, अकोले २६, राहुरू १५, शेवगाव ४१, कोपरगाव २५, जामखेड ४३, कर्जत २६ असे बाधित आढळून आले आहेत.
आज ६८१ करोनामुक्त यामध्ये मनपा १३३, संगमनेर ६१, राहता ५२, पाथर्डी २६, नगर ग्रामीण ४०, श्रीरामपूर २९, कॅन्टोनमेंट २२, नेवासा ६८, श्रीगोंदा १९, पारनेर ४०, अकोले ३१, राहुरी २६, शेवगांव ३४, कोपरगाव २०, जामखेड ३३, कर्जत २७, मिलिटरी हॉस्पिटल १७, इतर जिल्हा २ अशा रुग्णांचा समावेश आहे.
See: Latest Entertainment News, Latest Marathi News, and Latest Marathi News Live
Web Title: Ahemdnagar corona update TOday News 15