Home अहमदनगर अहमदनगर: पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेवारस मृतदेह

अहमदनगर: पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेवारस मृतदेह

Ahmednagar News:  साकुरी गावच्या शिवारात साकुरी पुलाचे जवळ पोटात असह्य वेदना होत असल्यामुळे पडलेला मिळून आला, उपचार सुरु  असतानाच काल पहाटे त्याचा मृत्यू.

Ahmednagar Abandoned bodies in police station limits

Rahata | राहता:  राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साकुरी पुलाजवळ पोटात असाह्य वेदना होत असल्यामुळे एकाने त्यास उपचारासाठी दवाखान्यात नेले. पण तो मयत झाला. त्याच्या नातेवाईकांचा शोध लागत नसल्याने नातेवाईकांनी संपर्क करुन मृतदेहाची ओळख पटवावी, असे आवाहन राहाता पोलिसांनी केले आहे.

राहाता पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यु 10/2023 सीआरपीसी 174 प्रमाणे नोंद केली आहे. सदर मयत इसम ख्वाजा हसन शेख रा. कर्नुल (आंध्रप्रदेश) हा दि. 1 फेब्रुवारी 2023 रोजी साकुरी गावच्या शिवारात साकुरी पुलाचे जवळ पोटात असह्य वेदना होत असल्यामुळे पडलेला मिळून आल्याने त्यास रस्त्याने जाणारे इसम दिलीप चंद्रकांत खुडे रा. सिन्नर, जिल्हा नाशिक यांनी उपचारार्थ शिर्डी येथे दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु  असतानाच काल रविवारी 19 फेब्रुवारी रोजी पहाटे त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान राहाता पोलिसांना या मयताच्या नातेवाईकांबाबत काहीच माहिती नाही. सदर बेवारस इसमाचा रंग गोरा, शरीराने मजबूत, उंची 5.5 फूट, पोट मोठे, नाक मोठे, व बसके, चेहेरा गोल, गळ्याचे खाली डावे बाजुस तीळ, अंगात पांढरे रंगाचा बनियान, निळे रंगाचा शर्ट व निळसर रंगाची पँट असा पेहराव व वर्णन आहे. तरी या इसमाबाबत कुणास काही माहिती असल्यास राहाता पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस नाईक एस. बी. आवारे यांनी केले आहे.

Web Title: Ahmednagar Abandoned bodies in police station limits

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here