खबरदार: पॉझिटिव्ह लपवत असाल, परस्पर उपचार घेत असाल तर कारवाई
Ahmednagar | अहमदनगर: महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेला माहिती न देता संशियीत कोरोना रुग्णांवर परस्पर उपचार करणाऱ्या तसेच लक्षणे असतानाही रुग्णांना चाचणी न करण्याचा सल्ला देणाऱ्या खासगी डॉक्टर आणि रुग्णालय यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी दिला आहे.
कोरोना बाधित व्यक्तीला सर्दी, खोकला, ताप अशी सौम्य लक्षणे आढळून येतात. अशी लक्षणे असलेली बहुतांशी रीगन आरोग्य केंद्रात चाचणी न करता खासगी डॉक्टरकडून औषधे घेऊन येतात. परंतु यातील संभाव्य कोरोना रुग्णामुळे त्यांच्या कुटुंबातील व इतर सदस्य व शेजारील नागरिक यांच्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याची व त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती निर्माण होते. लोक घरीच उपचार करीत असल्याने प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर महापालिकेच्या वतीने खासगी डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यास मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
Web Title: Ahmednagar Action if hiding positive, treating each other