Home अहमदनगर Ahmednagar: ऑडिओ क्लीपप्रकरण: दोन पोलीस कर्मचारी निलंबित

Ahmednagar: ऑडिओ क्लीपप्रकरण: दोन पोलीस कर्मचारी निलंबित

Ahmednagar Audio Clip case two police Constable break

Ahmednagar | श्रीरामपूर | Shrirampur:  अवैध धंदेवाल्यांकडून हप्ते वसुलीसंदर्भातील संभाषणाची ऑडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. त्याची गंभीर दखल घेऊन श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले दोन पोलीस कर्मचार्‍यांना निलंबीत करण्यात आले. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काल त्यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला.

पोलीस शिपाई लक्ष्मण दशरथ वैरागर व पोलीस कॉन्स्टेबल योगेश शिवाजी राऊत असे हे निलंबित झालेले कर्मचारी आहेत.

नेवासा नंतर पुणे येथील पोलिसांच्या ऑडिओ क्लिपनंतर श्रीरामपूर येथेही कर्मचारी व अधिकारी यांच्यातील हप्ते वसुलीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती.

काल श्रीरामपुरातील तालुका पोलीस ठाण्यातील पोलिसांचीही अवैध धंद्यावाल्याकडून वसुलीबाबतची क्लीप व्हायरल झाली. या क्लीपमध्ये संबंधित अधिकारी तसेच दोन पोलीस कर्मचारी यांच्यातील हमरातुमरी, शिवीगाळ करण्यात आल्याचे ऐकू येते. तसेच त्या प्रकरणात संबधीत अधिकार्‍यांने वसुलीबाबत दिलेला सल्ला काय आहे तेही या क्लिपमध्ये ऐकू येतो. दोघा पोलीस कर्मचार्‍यात वसुलीच्या कारणावरून वाद होऊन हमरातुमरी झाल्याचे तसेच अधिकार्‍याने वसुलीचे काम दुसर्‍याचे असल्याचे यात म्हटले आहे. तर याबाबत आपण वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याची धमकी कर्मचार्‍याने दिली आहे.

या घटनेची क्लीप व्हायरल झाल्याने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्याची गंभीर दखल घेत काल त्यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला. याबाबत चौकशी सुरु केली असुन सदर चौकशीच्या अनुषंगाने चौकशीत हस्तक्षेप करण्याचा व साक्षीदारांवर दबाव टाकण्याची संधी प्राप्त होऊ नये म्हणुन शासन सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

Web Title: Ahmednagar Audio Clip case two police Constable break

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here