Home अहमदनगर अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन अ‍ॅड. उदय शेळके यांचे निधन

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन अ‍ॅड. उदय शेळके यांचे निधन

Ahmednagar News: Ahmednagar District Central Cooperative Bank Chairman Adv. Uday Shelke passed away

Ahmednagar District Central Cooperative Bank Chairman Adv. Uday Shelke passed away

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जीएस महानगर बँकेचे चेअरमन अ‍ॅड. उदय शेळके (वय- ४६) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी ११ वाजता पिंप्री जलसेन (ता. पारनेर) येथे अंत्यविधी होणार आहे.

उदय शेळके यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी जिल्हा बँकेला आर्थिक शिस्त लावण्यासाठी काम केले.एकाच वेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जीएस महानगर बँका या दोन बलाढ्य बँकांचे अध्यक्षपदाची धुरा त्यांनी समर्थपणे पेलली होती.

त्यांच्या निधनाची माहिती मिळताच ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यांच्या पार्थिवावर पारनेर तालुक्यातील पिंप्री जलसेन या गावी रविवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

सहकार आणि बँकींग क्षेत्रात अतुलनीय योगदान देणारे अहमदनगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष तसेच सॉलिसिटर गुलाबराव शेळके महानगर बँकेचे अध्यक्ष श्री. उदय गुलाबराव शेळके यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुखःद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! – बाळासाहेब थोरात

उदय शेळके यांना काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांना ब्रेनस्ट्रोकचा झटका आला. त्यामुळे ते रुग्णालयात दाखल होते. लिलावती रूग्णालयात डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर उपचार केले. मात्र त्यात यश आले नाही आणि त्यांची प्राणज्योत मावळली ह्या सर्व परिस्थिती सोबत सामना करतानाच त्यांची प्राणज्योत मावळली.

Web Title: Ahmednagar District Central Cooperative Bank Chairman Adv. Uday Shelke passed away

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here