अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षकपदी राकेश ओला, मनोज पाटील यांना….
Ahmednagar District Superintendent of Police Rakesh Ola: अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षकपदी राकेश ओला यांची नियुक्ती.
अहमदनगर: राज्यातील २४ पोलीस अधीक्षकांच्या बदली बाबत आदेश गृह विभागाने गुरुवारी काढला आहे. अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षकपदी राकेश ओला (Rakesh Ola)यांची नियुक्ती झाली आहे.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना अद्याप पदस्थापना मिळालेली नाही. राकेश ओला यांनी यापूर्वी श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. सध्या ते नागपूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक होते.
आता नगर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणुन त्यांना नियुक्ती मिळाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचा नगर जिल्ह्यात दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यांनी 1 ऑक्टोबर 2020 मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून सूत्रे हाती घेतली होती. त्यांच्या कार्यकाळात अनेक गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यांनी जिल्हा पोलीस दलात ई-टपाल प्रणाली, टू-प्लस योजना प्रभावी राबवली.
Web Title: Ahmednagar District Superintendent of Police Rakesh Ola