Home अहमदनगर Ahmednagar Fire Case:  कडब्याच्या चालत्या ट्रकला आग

Ahmednagar Fire Case:  कडब्याच्या चालत्या ट्रकला आग

Ahmednagar Jamkhed Kadaba's moving truck caught fire

Ahmednagar| Jamkhed | जामखेड: जामखेड तालुक्यातील खर्डा येथे शिर्डी-हैदराबाद राज्य महामार्गावर कडब्याने भरलेल्या ट्रकने अचानक पेट घेतल्याने आग (Fire) लागून मोठे नुकसान झाले आहे. मात्र ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या मैदानात नेल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील खर्डा येथील वडारवस्ती जवळून जाणाऱ्या रस्त्यावरून कडबा वाहतूक करणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतला. यानंतर परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा केला असता ट्रकने पेट घेतल्याचे ट्रक चालकाच्या लक्षात आल्याने ट्रक चालकाने मोकळ्या मैदानात ट्रक लावल्याने मोठा अनर्थ टळला.

यावेळी शेजारीच असलेल्या अनिल बिल्डर सुरवसे, संतोष लष्करे व राजकुमार आजबे यांनी आपले घरातील पाण्याचे बोर चालू करून आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु आगीने रौद्ररूप धारण केले होते.

यावेळी परिसरातील नागेश रणभोर, विकास डोके, इरफान शेख, घनशाम भोसले, रमेश मदने, नितीन आहेर, नीलेश आहेर, रतन डोके, राजकुमार तेवर, प्रविण धोत्रे, काळू पवार, विकास डोके यांच्या सह शहरातील तरुणांनी शेजारी पडलेल्या बांधकामाचे लाकडे उचलून गाडीतील कडबा जमिनीवर ढकलून फेकून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याबरोबरच गावातील अनेक नायामुळे शिर्डी-हैदराबाद राज्य महामार्गावर पेटल्यामुळे बराच वेळ वाहतूक ठप्प होती. या घटनेत अग्निशामक दलाची गाडी उपलब्ध झाली नसल्याने आग विझवण्यात मोठी अडचण आल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले.

Web Title: Ahmednagar Jamkhed Kadaba’s moving truck caught fire

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here