Home Ahmednagar Live News सेलिब्रिटींना वेगळा न्याय आणि संताना वेगळा न्याय, असे का छावा संघटनेच्या महिलेंचा...

सेलिब्रिटींना वेगळा न्याय आणि संताना वेगळा न्याय, असे का छावा संघटनेच्या महिलेंचा सवाल

Ahmednagar News Chhawa organization have demanded his release on parole

अहमदनगर | Ahmednagar News: संजय दत्तच्या चाहत्यांनी मागणी केली म्हणून संजय दत्तला एक वर्षाची सवलत दिली. सलमान खानसाठी रात्री उशिरा कोर्टाचे दरवाजे उघडले गेले होते मात्र आसाराम बापूंना करोनाची बाधा झाली असताना तसेच तुरुंगातील वर्तन चांगले असताना त्यांची सुटका केली जात नाही.  सेलिब्रिटींना वेगळा न्याय आणि संताना वेगळा न्याय, असे का? असा सवाल छावा संघटनेच्या महिलानी केला आहे. आसाराम बापूंची पॅरोलवर सुटका करण्यात यावी अशी मागणी या महिलांनी केली आहे.

श्री योग वेदांत सेवा समिती व छावा संघटनेच्या वतीने केंद्र सरकारकडे ही मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. आसाराम बापू गेल्या ८ वर्षापासून जोधपुर कारागृहात आहेत. त्यांचे सध्याचे वय ८४ आहे. कारागृहातील वर्तन चांगले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुप्रीम कोर्टाने करोनाच्या पार्श्वभूमीवर कारागृहातील कैद्यांच्या बाबतीत दिलेल्या एका आदेशात म्हटले आहे की, ७० वर्षांवरील वय असलेल्या विविध व्याधीग्रस्त कैद्यांची पॅरोलवर सुटका करण्यात यावी अशी मागणी छावा संघटनेच्या महिलांनी केली आहे.

Web Title: Ahmednagar News Chhawa organization have demanded his release on parole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here