Home अहमदनगर अधिकाऱ्याला दमदाटी व शिवीगाळ करत डंपर पळविला

अधिकाऱ्याला दमदाटी व शिवीगाळ करत डंपर पळविला

Ahmednagar News hurled insults at the officer and snatched the dumper

अहमदनगर | Ahmednagar News: मंडल अधिकाऱ्यास दमदाटी व शिवीगाळ करत गौणखनिजांचा डंपर पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर तालुक्यातील वारूळवाडी येथील मिरवलीबाबा पहाडाजवळ २ जुलै रोजी सायंकाळी ही घटना घडली. याबाबत वाळकी येथील मंडल अधिकारी भागीनाथ जगन्नाथ वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोपाल जाधव व विशाल वारुळे रा. वारूळवाडी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

वारूळवाडी परिसरात दोघे आरोपी २ जुलै रोजी सायंकाळी अवैधरीत्या डंपरमधून गौण खनिजांची वाहतूक करताना वाघमारे यांना आढळून आले. यावेळी वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी डंपर तहसील कार्यालयात आणला होता.  या दोघानी शिवीगाळ करत डंपर पळवून नेला.

Web Title: Ahmednagar News hurled insults at the officer and snatched the dumper

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here