Home अहमदनगर बंदुकीचा धाक दाखवत एकमेकांत धमकी, दोघांना अटक

बंदुकीचा धाक दाखवत एकमेकांत धमकी, दोघांना अटक

Ahmednagar News Threatening each other at gunpoint

अहमदनगर | Ahmednagar News: बंदुकीचा धाक दाखवून एकमेकांना धमकाविल्याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

मनोज वासुमोल मोतीयानी रा, सावेडी गाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून काशिनाथ बबन शिंदे रा. वैदुवाडी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर काशिनाथ शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  मनोज वासुमोल मोतीयानी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

मोतीयानी यांच्या फिर्यादीनुसार, शिंदे याने माझ्या घरासमोर रोडवर येऊन बंदूक डोक्याला लावत दोन नंबर धंद्यात अडथळे आणतो का असे म्हणत गोळ्या घालण्याची धमकी दिली. तसेच दोन तोळे वजनाची सोन्याची चैन काढून घेतली.

शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत, मोतीयानीने माझ्या टपरीवर येत बंदुकीचा धाक दाखवत १० हजार रुपयांची मागणी केली. तसेच शिवीगाळ करत गल्ल्यातील तीन हजार रुपये काढून घेतले.

याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहे.

Web Title: Ahmednagar News Threatening each other at gunpoint

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here