Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: पिकअप आणि मोटारसायकलच्या अपघातात एक जण जागीच ठार

अहमदनगर ब्रेकिंग: पिकअप आणि मोटारसायकलच्या अपघातात एक जण जागीच ठार

Ahmednagar: Pickups and Motorcycles Accident one death one injured:  देवराई गावाजवळ पिकअप आणि मोटारसायकलच्या अपघातात मोटारसायकलस्वाराचा जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

Ahmednagar Pickups and Motorcycles Accident one death one injured

अहमदनगर | Pathardi: नगर-पाथर्डी महामार्गावरील  देवराई गावाजवळ पिकअप आणि मोटारसायकलच्या अपघातात मोटारसायकलस्वाराचा जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर पिकअप गाडी शेजारच्या शेतात जावुन थांबली.

याबाबत अधिक माहिती अशी की,  नगर-पाथर्डी महामार्गाचे काम चालु आहे. या रस्त्यावरील देवराई गावाजवळ रविवारी सायंकाळी तिसगावच्या दिशेने चाललेली पिकअप (एम.एच. 05 बीएच 6036) आणि समोरुन तिसगाववरुन  येणार्‍या मोटारसायकल (एम.एच.-16-बीजी-8398) यांच्यात समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात मोटारसायकलवरील सुनिल भरत बर्डे (वय 21 रा. कौडगाव आठरे, ता. पाथर्डी) हा जागीच ठार झाला. तर अविनाश बाळासाहेब जाधव (वय 19 रा. कौडगाव ता. पाथर्डी) हा तरुण गंभीर जखमी झाला.

पिकअपच्या चालक मालकाचे नाव समजु शकले नाही. समोरासमोर झालेल्या या अपघातात पल्सर गाडीचे मोठे नुकसान झाले तर पिकअप गाडीचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने पिकअप गाडी शेजारच्या शेतात जावुन थांबली. पाथर्डी पोलिस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Web Title: Ahmednagar Pickups and Motorcycles Accident one death one injured

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here