Home अहमदनगर अहमदनगर: शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग

अहमदनगर: शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग

Ahmednagar Crime: कान्हेगाव येथील अल्पवयीन मुलीला मोटारसायकलवर शाळेत सोडतो, असे म्हणून तिचा विनयभंग ( Molested) केल्याची घटना.

Ahmednagar School girl molested

श्रीरामपूर: तालुक्यातील पढेगाव  येथे सातवीच्या वर्गात शिकत असलेल्या कान्हेगाव येथील अल्पवयीन मुलीला मोटारसायकलवर शाळेत सोडतो, असे म्हणून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील कान्हेगाव परिसरात राहणारी 13 वर्षांची अल्पवयीन मुलगी ही पढेगाव येथील शाळेत इयत्ता 7 वीत शिकते. सदर मुलीचा भावाला काल शाळेत जायचे नसल्याने 10.45 च्या सुमारास या अल्पवयीन मुलीने सुनील वेणूनाथ खरात याच्याशी ओळख असल्याने तिने खरात याला बापू तुम्ही कोठे चालला ? असे विचारले. तेव्हा खरात याने मी श्रीरामपूरला चाललो, असे सांगितले. तेव्हा या मुलीने श्रीरामपूरला जाताना मला पढेगाव येथे शाळेत सोडता का? असे विचारले. तेव्हा खरात याने हो म्हटल्याने ही मुलगी गाडीवर पाठीमागे बसली.

कान्हेगाव-पढेगाव दरम्यान सदर खरात याने चालू मोटारसायकलवर डावा हात मागे घेवून सदर मुलीला लज्जा होईल, अशाठिकाणी हात लावला. तेव्हा सदर मुलीने हे काय करता ? असे विचारले असता मी माझे पाकीटातून पासबुक काढत आहे, असे खरात तिला म्हणाला. त्यानंतर त्याने पुन्हा पाठीमागे हात टाकून मुलीला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. त्यामुळे सदर मुलगी घाबरली. तिने गाडी थांबवा, असे म्हटल्याने या खरात नावाच्या व्यक्तीने तिला शाळेजवळ सोडून दिले. तेथून ही मुलगी रडत शाळेत गेली आणि तिने आपल्या शिक्षिकेला हा प्रकार सांगितला. सदर शिक्षिकेने मुलीच्या वडिलांना बोलावून घेतले आणि घडलेला प्रकार सांगितला.

त्यानंतर आरोपी सुनील वेणूनाथ खरात, रा. कान्हेगाव, ता. श्रीरामपूर याच्याविरोधात श्रीरामपूर तालुका पोलिसात फिर्याद दिल्यावरून भादंवि कलम 354, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8, 12 तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक अधिनियम 1989 चे कलम 3 (1) (W) (I), 3 (1) (W) (II), 3 (2) (त) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Ahmednagar School girl molested

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here