Home Ahmednagar Live News धक्कादायक: आरोग्य केंद्राने बाहेरचा रस्ता दाखविल्याने महिलेचे रस्त्यावरच प्रसूती

धक्कादायक: आरोग्य केंद्राने बाहेरचा रस्ता दाखविल्याने महिलेचे रस्त्यावरच प्रसूती

Ahmednagar woman gave birth on the road as the health center showed the way out

Ahmednagar News | Rahuri | राहुरी: देवळाली प्रवरा येथील आरोग्य केंद्राने महिलेचे प्रसूतीचे दिवस न भरल्याने आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी तिला बाहेरचा रस्ता दाखविल्याने तिची रस्त्याच्या कडेला प्रसूती झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

देवळाली प्रवरा येथे गुरुवारी सकाळी सहा वाजता एक महिला प्रसूतीच्या मरणकळा घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात आली. तिचे दिवस भरले नाहीत. म्हणून आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी तिला बाहेरचा रस्ता दाखविला. कडक्याच्या थंडीत जड पावलांनी आरोग्य केंद्राबाहेर आल्यावर तिच्या कळा पुन्हा वाढल्या. परिसरातील महिला मदतीला धावल्या. सकाळी पावणे नऊ वाजता भर रस्त्याच्या कडेला साड्यांच्या आडोशात तिची प्रसूती झाली.

सुमन अरुण शिंदे (रा. देवळाली प्रवरा) असे बाळंतिणीचे नाव आहे. त्यांची प्रसूतीच्या मरण यातनेतून सुखरूप सुटका झाल्यावर आरोग्य केंद्रातील अधिकारी-कर्मचारी भानावर आले. बाळ- बाळंतिणीला आरोग्य केंद्रात दाखल करून, औदार्य दाखविण्यात आले. ही संतापजनक घटना वाऱ्यासारखी शहरात पसरली. नागरिकांनी आरोग्य केंद्राबाहेर संताप व्यक्त करत निषेध व्यक्त केला आहे.

रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात म्हणाले, देवळाली प्रवरा आरोग्य केंद्रात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची मनमानी सुरू आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. परिसरातील महिलांनी साड्यांचा आडोसा करून, भर रस्त्याच्या कडेला बाळंतिणीची सुखरूप सुटका केली. या घटनेची चौकशी करून, दोषी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी. अन्यथा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा थोरात यांनी दिला आहे. 

Web Title: Ahmednagar woman gave birth on the road as the health center showed the way out

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here