मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू
Ahmednagar Accident News | अहमदनगर: शहरातील सावेडी उपनगरातील सोनानगर चौकात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अभिषेक अर्जुन शिरसाठ (वय 17 रा. विराज कॉलनी, तारकपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी डॉ. अर्जुन आनंदराव शिरसाठ यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अभिषेक हा सावेडी भागात मॉर्निंग वॉकला जात होता. तो नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजता सावेडीतील कुष्ठधाम रस्त्यावरील सोनानगर चौकात गेला होता. त्यास चुकीच्या दिशेने येऊन समोरून जोराची धडक दिली. या अपघातानंतर दुचाकीस्वार फरार झाला. अभिषेक या अपघातात गंभीर जखमी होऊन मयत झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी डॉ. अर्जुन आनंदराव शिरसाठ यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दुचाकीस्वाराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार गिरीगोसावी अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Ahmednagar young man who was going for a morning walk died in an accident