Home अहमदनगर अहमदनगर:  युवकाची  गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर:  युवकाची  गळफास घेऊन आत्महत्या

Ahmednagar Suicide News: युवकाने घरातील अँगलला नायलॉन दोरीच्या साहायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.

Ahmednagar Youth committed suicide by hanging 

जामखेड | Jamkhed:  नगरपरिषद हद्दीतील जमादारवाडी येथील एका युवकाने घरातील अँगलला नायलॉन दोरीच्या साहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. ९) सायंकाळी सहा वाजता उघड झाली.

युवराज बाळासाहेब आजबे (रा. जमादारवाडी, जामखेड) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव ■आहे. मृत युवराज आजबे याचा भाऊ विठ्ठल बाळासाहेब आजबे यांनी पोलिसांत खबर दिली. जामखेड नगरपरिषद हद्दीतील जमादारवाडी येथे युवराज आजबे याचे कुटुंब राहत होते. युवराजचा भाऊ विठ्ठल आजबे हा रिक्षा चालवितो. गुरुवारी सायंकाळी विठ्ठलच्या पत्नीने फोन केला. त्यानंतर  विठ्ठल आजबे घरी गेल्यानंतर युवराज याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यांनी जामखेड पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी भेट  देऊन मृत युवराज आजबे याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला. शवविच्छेदन करून मृतदेह  नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Web Title: Ahmednagar Youth committed suicide by hanging 

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here