७०० लोकांचा बळी गेला, तेव्हा सरकारला दया आली नाही का: मधुकरराव नवले
अकोले | Akole: शेतकऱ्यांना भूमिहीन करणारे काळे कायदे केंद्र सरकारने रद्द केले, यासाठी शेतकरी वर्गाने ११ महिने लढा दिला सरकारने काळ्या आईच्या लेकरांना वर्षभर खीतपत ठेवले, त्यात ७०० लोकांचा बळी गेला. त्यावेळी सरकारला दया का आली नाही? असा सवाल राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले यांनी मोदी सरकारला विचारला आहे.
मोदी सरकारने हे काळे कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला तो स्वागतार्ह आहे. पण वर्षभर केंद्र सरकारची असंवेदनशीलता सर्व देशाने बघितली. प्रत्येक राज्यात या घटनेचे पडसाद उमटत असताना शेतकऱ्यांचा असंतोष वाढला. याचा थेट परिणाम येणाऱ्या निवडणुकांवर होऊ शकतो हे सरकारच्या लक्षात आल्यामुळे त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया मधुकरराव नवले यांनी दिली.
Web Title: Akole 700 people were killed, why didn’t the government show mercy