Home अकोले अकोले तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आजही पुन्हा ४० व्यक्ती बाधित

अकोले तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आजही पुन्हा ४० व्यक्ती बाधित

Akole taluka Today 40 corona infected

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज पुन्हा ४० करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यातील  रुग्ण संख्या पाचव्या शतकाजवळ…! एकुण संख्या ४८९.

ढोकरी,वाघापुर,धामणगाव-पाट, पाडाळणे, खानापुर, कोंभाळणे,म्हाळादेवी, मनोहरपुर आदि नविन गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव. तालुक्यात कोरोनाचे  रुग्ण वाढत असल्याने तालुक्यातील कोरोना टेस्ट घेण्यासाठी आरोग्य विभागाचे विभागवार नियोजन.

खानापुर कोविड सेंटर सह कोतुळ प्राथमिक आरोग्य केंद्रराजुर ग्रामीण रुग्णालय, ब्राम्हणवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र, देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्र, आदि ठिकाणी ॲन्टीजन टेस्ट घेण्यास सुरूवात.

आज खानापुर कोविड सेंटर येथे १०३ व्यक्तीच्या रॅपिड ॲन्टीजन टेस्ट घेण्यात आल्या यामध्ये १६ व्यक्तीचा अहवाल कोरोना पॅाझिटीव्ह आला आहे. यामध्ये शहरातील शेकईवाडी येथील ३१ वर्षीय महीला, मनोहरपुर येथील १४ वर्षीय तरुण, १३ वर्षीय तरुण, ६९ वर्षीय महीला,२ १ वर्षीय महीला, १७ वर्षीय युवती, नवलेवाडी येथील ५४ वर्षीय पुरुष, ४९ वर्षीय महीला, धुमाळवाडी येथील २० वर्षीय तरुण, २२वर्षीय महीला, ढोकरी येथील ४८ वर्षीय पुरूष, ४० वर्षीय पुरूष, ३३वर्षीय पुरूष, ३५ वर्षीय महीला, खानापुर येथील ५३ वर्षीय पुरूष, २९ वर्षीय महीला अशी १६ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

तर कोतुळ प्राथमिक आरोग्य केंद्रात  घेण्यात आलेल्या ३९ ॲन्टीजन टेस्ट मध्ये ०४ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे यात पाडाळणे येथील ६७ वर्षीय पुरूष, अंभॊळ येथील ७० वर्षीय पुरुष, धामणगाव पाट येथील १५ वर्षीय तरुण, वाघापुर येथील २२ वर्षीय तरूण अशा ०४ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

तर ब्राम्हणवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या ४५ ॲन्टीजन टेस्ट मध्ये ब्राम्हणवाडा येथील ९० वर्षीय पुरूष, ५० वर्षीय पुरुष, २५ वर्षीय पुरूष,६५ वर्षीय महीला ०४ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या ॲन्टीजन टेस्टमध्ये ४० वर्षीय महीला, २५ वर्षीय महीला, व ०५ वर्षीय लहान मुलगी अशा ३ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला. राजुर ग्रामीण रूग्णालयात घेण्यात आलेल्या ०८ टेस्टमध्ये जामगाव येथील ४७ वर्षीय महिलेचा अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात ढोकरी येथील ८० वर्षीय पुरुष, कोंभाळणे येथील ५५ वर्षीय पुरूष, म्हाळादेवी येथील ५० वर्षीय पुरुष अशी ३ व्यक्ती पॅाझिटीव्ह आलेत तर  खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात, शहरातील कारखानारोडवरील ५९ वर्षीय पुरूष, महालक्ष्मी कॅालणीतील ५५ वर्षीय पुरूष, लहीत येथील ६७ वर्षीय पुरूष, कोतुळ येथील ७२ वर्षीय महीला, हिवरगाव आंबरे येथील ४० वर्षीय पुरूष, ढोकरी येथील ६२ वर्षीय पुरूष, धुमाळवाडी येथील ५२ वर्षीय पुरुष, ४७ वर्षीय महीला, २३ वर्षीय महीला अशी ०९ व्यक्ती कोरोना बाधित आले असुन आज दिवसभरात तालुक्यात एकुण ४० व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

तालुक्यातील एकुण रुग्ण संख्या ४८९  झाली आहे. त्यापैकी ३१६ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे तर १० व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सध्या १६३ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

पत्रकार: अल्ताफ शेख, अकोले

Website Title: Akole taluka Today 40 corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here