Home अहमदनगर अहमदनगर: तरुणीस वेश्या व्यवसायात अडकविणार्‍यास अटक

अहमदनगर: तरुणीस वेश्या व्यवसायात अडकविणार्‍यास अटक

Ahmednagar Arrested:  तरुणीस वेश्या व्यवसायात अडकविणार्‍या फरार असलेल्या तरुणास तीन वर्षानंतर अटक.

Arrested for hooking young woman into the prostitution business

अहमदनगर: तरूणीस वेश्या व्यवसायामध्ये अडकविणार्‍या पसार तरूणाला तीन वर्षांनंतर अटक करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले. गिरीष रवींद्र थोरात (वय 34 रा. बोल्हेगाव) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. त्याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात 10 एप्रिल, 2019 रोजी गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तो पसार होता.

मुंबई येथील पीडित तरूणीला जास्त पगाराचे घरगुती काम मिळून देतो, असे सांगून नगरमध्ये बोलून घेतले. तरूणी बोल्हेगाव येथे आल्यानंतर तिला वेश्या व्यवसाय करण्यास सांगितले. तरूणीने नकार दिला असता तिला 2 एप्रिल 2019 ते 9 एप्रिल, 2019 दरम्यान मारहाण करण्यात आली. तरूणीने सुटका करून घेत तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. दिलेल्या फिर्यादीवरून गिरीष थोरात व पल्लवी ऊर्फ शारदा राजेंद्र मांगडे (रा. बोल्हेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी

शारदा मांगडे हिला यापूर्वी अटक करण्यात आली होती. गिरीष थोरात पसार होता. गिरीष पत्रकार चौकात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान सोळुंके, अंमलदार दत्तात्रय जपे, सुनील शिरसाठ, संदीप धामणे, अविनाश वाकचौरे, अहमद इनामदार, वसिम शेख, सुरज वाबळे, सतिष त्रिभुवन यांच्या पथकाने गिरीष थोरातला अटक केली.

Web Title: Arrested for hooking young woman into the prostitution business

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here