Home अहमदनगर अहमदनगर: गावठी कट्टा बाळगणारा गजाआड, मुद्देमाल जप्त

अहमदनगर: गावठी कट्टा बाळगणारा गजाआड, मुद्देमाल जप्त

Ahmednagar News :विना परवाना गावठी कट्टा व २ जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या इसमाला अटक (Arrested) करण्यात पोलिसांना यश.

Arrested who was carrying a gavathi katta, seized the property

नेवासा:  नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला येथे विना परवाना गावठी कट्टा व २ जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या इसमाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून ३१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  कैलास आसाराम म्हस्के असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीविरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक (श्रीरामपूर) स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Arrested who was carrying a gavathi katta, seized the property

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here