Home संगमनेर संगमनेर: …. तर हल्लेखोरांचा जागेवरच बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही- आ. अमोल खताळ

संगमनेर: …. तर हल्लेखोरांचा जागेवरच बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही- आ. अमोल खताळ

Breaking News | Sangamner: कोणत्याही महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर महायुतीचे कार्यकर्ते त्या हल्लेखोरांचा जागेवरच बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही.

attackers will not be left without being stopped on the spot - MLA Amol Khatal

संगमनेर:  तालुक्यात यापुढे कोणत्याही महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर महायुतीचे कार्यकर्ते त्या हल्लेखोरांचा जागेवरच बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला आहे. घुलेवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या कीर्तनात हिंदुत्वावर बोलणार्‍या संग्रामबापू भंडारे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आमदार खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद बोलताना त्यांनी हा इशारा दिला. भंडारे महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अवघ्या काही मिनिटांतच औरंगजेबाचा (अफझल्याचा) वध केला असल्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे माजी आमदारांच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या गाडीची तोडफोड केली.

या घटनेचा निषेध करताना आमदार खताळ म्हणाले, ही घटना निंदणीय आहे. अखंड हरिनाम सप्ताहात संग्रामबापू महाराज भंडारे यांनी अध्यात्माच्या माध्यमातून हिंदू धर्मावर किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात बोलत असताना अफजलखानाच्या नावाचा उल्लेख केला त्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मिरची झोंबण्याचे काहीच कारण नव्हते. विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव पचवता येत नसल्याने त्यांचे कार्यकर्ते महाराजांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न करत करत आहे. मात्र, संगमनेर तालुक्यात असे प्रकार अजिबात सहन केले जाणार नाही. या प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना पोलीस प्रशासनाला आपण दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांत गुन्हाही दाखल झालेला असल्याचे त्यांनी सांगितले.

तुम्ही ईव्हीएमवर किंवा मतदार यादीवर चर्चा करण्यापेक्षा तुमचा पराभव कशामुळे झाला याचे सर्वप्रथम आत्मपरीक्षण करा असा टोलाही त्यांनी माजी आमदारांचे नाव न घेता लगावला. यावेळी महायुतीचे शरद पानसरे, स्वरूप राऊत, विलास राऊत, स्वप्नील राऊत, संजय पानसरे, सीताराम पानसरे, रोशन प्रशांत राऊत, रोशन कोथमिरे, श्याम नाईकवाडी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज आंदोलन…

या घटनेमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. परंतु, हे कायद्याचे राज्य आहे त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नका. सर्वांनी संयम राखा अशा सूचना आपण कार्यकर्त्यांना दिल्या असून सकल हिंदू समाजाच्यावतीने सोमवारी (दि.18) करण्यात येणार्‍या रास्ता रोको आंदोलनास माझा पाठिंबा असून स्वतः उपस्थित राहणार असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले. तसेच संगमनेर अशांत करण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई केली नाही तर त्या अधिकार्‍यांच्या बदल्यांबाबतही निर्णय घ्यावा लागेल असा इशाराही दिला आहे.

Breaking News: attackers will not be left without being stopped on the spot – MLA Amol Khatal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here