Home महाराष्ट्र कुटुंबाचा अंगावर रॉकेल ओतून मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न

कुटुंबाचा अंगावर रॉकेल ओतून मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न

attempt to set himself on fire with his family in front of the ministry

हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील माळवटा गावातील राजू चन्नापा हुनगुंडे आणि त्यांच्या कुटुंबाने रस्त्याच्या कामाचे पैसे न मिळाल्याने अंगावर रॉकेल ओतून (Fire) मंत्रालयासमोर आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

यावेळी राजू चन्नापा हुनगुंडे यांनी माध्यमांना सांगितले की,  आपण नांदेड जिल्ह्यातील पालम रोड धानोरा काळे येथील जवळपास साडे आठ किलोमीटरच्या रस्त्याचं काम केलं होते. काम पुर्ण झाले असून कामाची किंमत जवळपास 1 कोटी 70 लाख रुपये आहे. त्यापैकी केवळ 14 लाख रुपये देण्यात आले असून,  कामाचे उर्वरित पैसे मागितले असता माझ्या कुटुंबाला जबर मारहाण केली असल्याचा आरोप हनगुंडे यांनी केला आहे.

दरम्यान, याबाबत आपण काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचीदेखील भेट घेतली होती. मात्र तरीदेखील आपले काम झाले नाही, त्यामुळे अखेर आम्ही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असे राजू यांनी म्हंटले आहे.

Web Title: attempt to set himself on fire with his family in front of the ministry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here