Home संगमनेर सत्यजीत तांबे प्रकरणावर बाळासाहेब थोरात यांनी मौन सोडलं, ते म्हणाले…..

सत्यजीत तांबे प्रकरणावर बाळासाहेब थोरात यांनी मौन सोडलं, ते म्हणाले…..

Satyajeet Tambe | Nashik Graduate Election: संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे  नेते सत्यजीत तांबे याप्रकरणी बाळासाहेब थोरात यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

Balasaheb Thorat breaks silence on Satyajeet Tambe case

संगमनेर: संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे (Sayajeet Tambe) यांनी विजय मिळवला. या निवडणुकीपूर्वी काँग्रेसने तांबे पिता-पुत्रांवर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले होते. त्यानंतर सत्यजीत तांबेंनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. दरम्यान, या प्रकरणावर आता बाळासाहेब थोरात यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संगमनेरमध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

थोरात म्हणाले, मी गेल्या महिनाभरापासून रुग्णालयात होतो. माझ्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाल्याने मला कार्यकर्त्यांपासून लांब रहावं लागलंय. आम्ही संघर्षातून नेहमीच यश मिळवलंय. नाशिक विधानसभा मतदासंघातून अपक्ष निवडणूक लढवून सत्यजित तांबे चांगल्या मतांनी विजयी झाले आहेत, त्यामुळे त्यांचं अभिनंदन. गेल्या महिनाभरात ज्या काही घडामोडी घडल्या आहेत. त्या सर्व घडामोडींचं काही जण चुकीच्या पध्दतीनं राजकारण घडवून आणत होते, असा आरोप त्यांनी केला आहे.

तसेच, मी माझ्या भावना काॅंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत. हे पक्षीय राजकारण आहे. हे बाहेर बोलू नये या मताचा मी कायम आहे. त्यामुळे त्या बाबतीत जे काही आहे ते मी पक्षश्रेष्ठींना कळवले आहे. पक्ष आणि माझ्या पातळीवर योग्य निर्णय घेऊ. जे काही करायचे ते योग्य करू. आपण काही काळजी करू नका. काॅंग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. मधल्या काळात अशा काही बातम्या आल्या की, आपल्याला पार भाजपपर्यंत नेऊन पोहचवले. भाजपच्या तिकीटाचे वाटपही त्यांनी करुन टाकल्या. काही लोकांनी गैरसमज पसरवला. ते कशा पद्धतीने गैरसमज करतात हे पाहीले अनेक चर्चाही त्यांनी घडवून आणल्या, असही ते म्हणाले.

महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर मोठ्या प्रमाणात राजकारण होतं आहे. अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे, त्यांना अडचणी आणलं जात आहे, त्यांचे उद्योग बंद पाडण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र, आपण अनेकदा संघर्ष केला आहे. संघर्षातूनच आपण मोठं झालो आहे. त्यामुळे या संघर्षातून आपण नक्कीच बाहेर येऊ, असा मला विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, नागपूर अधिवेशनावेळी मी सकाळी फिरायला गेलो होतो. यावेळी चालताना माझा तोल गेला आणि मी पडलो. त्यामुळे खांद्याला दुखापत झाली. ब्रीच कॅंडी या रुग्णायात माझ्यावर उपचार झाले. डॉक्टरांनी मला एक महिना प्रवास करण्यास मनाई केली म्हणून मी कार्यक्रमाला येऊ शकलो नाही, अशी महितीही त्यांनी दिली.

Web Title: Balasaheb Thorat breaks silence on Satyajeet Tambe case

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here