अहमदनगर: तरुणाचा मृतदेह आढळला, टनक हत्याराने मारहाण
Ahmednagar | Jamkhed: टनक हत्याराने मारहाण (Dead body): अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल.
जामखेड: शहराजवळील साकत रस्त्यावर ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्यावर टनक हत्याराने वार केल्याचे निदर्शनास आले आहे. गणेश शिवाजी वारे (वय ३०, रा. संगम जळगाव, ता. गेवराई, जिल्हा, बीड) असे मयताचे नाव असून याप्रकरणी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गणेश शिवाजी वारे याचा शहराजवळील साकत रोडवरील धोत्री गावच्या हद्दीत जुन्या कॉटन जिनिंग मिलच्या गेटसमोर मृतदेह आढळून आला. टनक हत्याराने त्याच्या पोटावर, पाठीवर, छातीवर व डोक्यावर तसेच हातापायांवर जबर मारहाण केल्याच्या खुना आहेत. घटनेची माहिती मिळताच कर्जतचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे व जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी मयत गणेश याचे वडील शिवाजी मारुती वारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे करत आहेत.
Web Title: body of the young man was found, beaten with a heavy weapon