Home क्राईम Murder: २० वर्षीय महाविद्यालयीन युवकाचा निर्घृण खून, तिघांवर गुन्हा

Murder: २० वर्षीय महाविद्यालयीन युवकाचा निर्घृण खून, तिघांवर गुन्हा

Indapur Murder News: पूर्व वैमन्यास्यातून २० वर्षीय महाविद्यालयीन युवकाचा खून केल्याची घटना, तिघांवर गुन्हा दाखल.

Brutal Murder of 20-year old college youth in Indapur taluk Crime against three

इंदापूर: पूर्वीच्या वैमनस्यावरून करेवाडी (ता. इंदापूर) येथील २० वर्षे वयाच्या महाविद्यालयीन युवकाचा खून (Murder) केल्याच्या आरोपावरून तिघांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रणव नानासाहेब करे (वय २०, रा. करेवाडी, ता. इंदापूर) असे मयताचे नाव आहे. राजकुमार पवार (रा. बाबा चौक, इंदापूर), इरफान शेख (रा. इंदापूर), फरदिन मुलाणी ( रा वडापुरी, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. प्रणवचा भाऊ प्रतीक नानासाहेब करे याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा

प्रणव यास आरोपी जीवे ठार मारण्याची धमकी देत होते. फिर्यादी त्यांना विचारणा करण्यास गेला. त्यावेळी त्याला ही धमकावण्यात आले होते. काल (दि. ५) आरोपींनी प्रणव याचा पाठलाग करून कशाने तरी मारहाण करून त्याला जीवे ठार मारले आहे, असे दिलेल्या फिर्यादीत प्रतीक करे याने म्हटले आहे. फौजदार दाजी देठे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Brutal Murder of 20-year old college youth in Indapur taluk Crime against three

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here