Home महाराष्ट्र Budget 2021 Live: नेमकी काय होणार स्वस्त आणि काय महाग, जाणून घ्या

Budget 2021 Live: नेमकी काय होणार स्वस्त आणि काय महाग, जाणून घ्या

Budget 2021 Live

Budget 2021 Live: 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यांनी संसदेत वित्तीय वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर केला आहे. करोनाच्या संकटकाळात अनेक गोष्टींवर आयात कर कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला असल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे.

अर्थसंकल्पात या दोन गोष्टीकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष असते एक म्हणजे इन्कम टॅक्स  स्लॅब मध्ये बदल होणार की नाही आणि दुसरे कोणत्या गोष्टी होणार स्वस्त व कोणत्या महागणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

यामध्ये इन्कम टॅक्स  स्लॅब मध्ये मोदी सरकारकडून कोणतही बदल करण्यात आलेला नाही. तसेच आयात कर कमी करून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

नेमकी काय होणार स्वस्त?

सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कात घट करण्यात आली आहे. त्यामुळे सोनं आणि चांदी आता आणखी स्वस्त होणार

चामड्यापासून बनविलेल्या वस्तू,

तांब्याच्या वस्तू

स्टील आणि लोखंडी वस्तूच्या किमती कमी होणार

नेमकी काय होणार महाग?

मोबाईलच्या काही पार्टसवर कर वाढविण्यात आल्याने मोबाईलचे दर वाढणार

परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या वाहनांच्या सुट्या भागावरील कर वाढविल्याने वाहनांच्या किमतीत वाढ होणार

परदेशातून आयात केले जाणारे कपडे,

कॉटनचे कपडे महागणार

Web Title: Budget 2021 Live

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here