संगमनेर: अज्ञात तरुणांकडून व्यापाऱ्याला मारहाण
Breaking News | Sangamner Crime: एका व्यापाऱ्याला अज्ञात तरुणाने शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व बॅटने मारहाण करून जखमी .
संगमनेर : संगमनेरला जाण्यासाठी रस्ता कोणता आहे, हे विचारणाऱ्या एका व्यापाऱ्याला अज्ञात तरुणाने शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व बॅटने मारहाण करून जखमी केले. तालुक्यातील गणेशवाडी शिवारात शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जाफर ईमान शेख (वय ३०, रा. सय्यद बाबा चौक, संगमनेर) हे आपल्या मित्रासह हिवरगाव पावसा, टोल नाका जवळील लक्ष्मी हॉटेलमधून जेवन करुन संगमनेरकडे येत असतांना रस्ता चुकल्याने त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या एका तरुणाला संगमनेरला जाण्यासाठी रस्ता कोणता आहे, असे विचारले. तेव्हा तुझे नाव काय आहे, असे त्या तरुणाने व्यापाऱ्यास विचारले असता, या व्यापाऱ्याने आपले नाव सांगितले. त्यानंतर सदर तरुणाने या व्यापाऱ्याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व बॅटने व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आली.
Web Title: Businessman beaten up by unknown youths