Home संगमनेर संगमनेर: पुणे-नाशिक महामार्गावर गोमांस वाहतूक करणारी कार पकडली

संगमनेर: पुणे-नाशिक महामार्गावर गोमांस वाहतूक करणारी कार पकडली

Breaking News | Sangamner Crime: गोमांसची वाहतूक करणारी अलिशान कार पोलिसांनी पकडून 5 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

Car transporting beef caught on Pune-Nashik highway

संगमनेर:  पुणे-नाशिक महामार्गावरील घारगावजवळ सोमवारी (दि.28) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गोमांसची वाहतूक करणारी अलिशान कार पोलिसांनी पकडून 5 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात केला आहे. याप्रकरणी दोघांवर घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, घारगावचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना गोपनीय बातमीदाराकडून अलिशान कारमधून संगमनेरहून पुणेकडे गोमांस वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावेळी त्यांनी तत्काळ पोहेकॉ. दिवटे, पोकॉ. गाडेकर, सुभाष बोडखे यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर पंचांना घेऊन पोलिसांच्या पथकाने पुणे-नाशिक महामार्गाच्या नजीक असलेल्या मुळा नदीवरील पुलाजवळ दिसणार नाही अशा स्थितीत उभा राहिले. काही वेळातच संगमनेरकडून पुणेच्या दिशेने जाणारी इकोस्पोर्ट कार (एमएच.01, बीके.3545) येताना दिसली. त्यामध्ये पुढील बाजूस दोघे बसलेले दिसून आले असता खात्री होताच कार रस्त्याच्या कडेला घेण्याचा इशारा केला.

चालकाने कार रस्त्याच्या कडेला घेतली असता कारमध्ये काय आहे? असे विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सदर कारची पंचांसमक्ष पाहणी केली असता पाठीमागील आसन काढून काळ्या रंगाच्या प्लास्टिक कागदात गोमांस भरलेले दिसून आले. याप्रकरणी पोकॉ. सुभाष बोडखे यांनी घारगाव पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन फिरोज सिकंदर शेख (वय 37) व अयाज पापामिया मोमीन (वय 32, दोघेही रा. अळकुटी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर), यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 40 रुपये किमतीचे अंदाजे 700 किलो गोमांस व 4 लाख रुपये किमतीची कार असा एकूण 5 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Breaking News: Car transporting beef caught on Pune-Nashik highway

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here