Home Accident News Accident: नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात; चालक जागीच ठार

Accident: नाशिक-पुणे महामार्गावर भीषण अपघात; चालक जागीच ठार

Accident: मोपेड व मेक्सिमो टेम्पो यांच्यात धडक होऊन मोपेड चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना.

Accident on Nashik-Pune highway The driver died on the spot

जुन्नर:  पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव-वारूळवाडीला जोडणाऱ्या मुख्य पुलावर मोपेड व मेक्सिमो टेम्पो यांच्यात धडक होऊन मोपेड चालकाचा जागीच मृत्यू झाला.ही घटना गुरुवारी (दि. १५) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. मनीष भालभद्र मेहता (वय ४३, रा. कुबेर आंगण, कोल्हे मळा, नारायणगाव) असे या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत फिर्याद निलेश हनुमंत जेजुरकर (रा. शेटे मळा, नारायणगाव) यांनी दिली असून पोलिसांनी टेम्पो चालक विक्रम शंकर मोडवे (वरय ३३, रा. येडगाव) याला ताब्यात घेतले आहे.

Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मनीष मेहता हे वारूळवाडीकडून नारायणगावकडे त्यांच्या मोपेड गाडीने (एमएच १४ जेक्यू २७९५) येत होते. या वेळी औषध वाहतूक करणारा छोटा मेक्सिमो टेम्पो (एमएच १४ जीडी ५४७१) हा नारायणगावहून वारूळवाडीकडे चालला होता. या दोन्ही गाड्या मीना नदी पुलावर आले असता दोघांमध्ये धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की मनीष यांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: Accident on Nashik-Pune highway The driver died on the spot

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here