Home क्राईम खळबळजनक! संगमनेरात महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

खळबळजनक! संगमनेरात महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Sangamner Crime:  एका महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणार्‍या अल्पवयीन मुलीला विविध ठिकाणी नेवून तिच्यावर अत्याचार (abused) केल्याची धक्कादायक घटना.

College minor Girl abused in Sangamner

संगमनेर: संगमनेर येथून खळबळजनक वृत्त समोर आले आहे. येथील एका महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणार्‍या अल्पवयीन मुलीला विविध ठिकाणी नेवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अल्पवयीन मुलगी संगमनेर शहरातील एका महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे. एप्रिल २०२३ ते २१ ऑगस्ट दरम्यान आशिष राऊत व किरण सोपान राऊत (दोघे रा.मालुंजकर वस्ती, राऊतमळा, घुलेवाडी) यांनी या अल्पवयीन मुलीच्या अज्ञान पनाचा गैरफायदा घेत तिला फुस लावून संगमनेर, शिर्डी, पेमगिरी, विठ्ठलकडा, कर्हेघाट अशा विविध ठिकाणी नेवून तिच्यावर सातत्याने अत्याचार केला आहे. त्यानंतर सागर मालुंजकर, कॅफे मालक व लॉज मालक या दोघांनी अशिष व किरण यांना मदत केली आहे.

याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी वरील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जाधव हे करत आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: College minor Girl abused in Sangamner

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here