संतापजनक: वेडसर महिलेवर बलात्कार, चपलेवरून आरोपी अटकेत – Rape Case

Aurangabad | औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील शिऊर पोलीस हद्दीत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. वेडसर महिलेला मारहाण करून बलात्कार (rape) केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला आला आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने तक्रार पोलिसांत तक्रार दिली आहे. घटनास्थळी सापडलेल्या चापालेवरून आरोपीला दोन तासांत ताब्यात घेण्यात यश आले आहे.
प्रेमसिंग मन्साराम मेवाळ असे आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, एका वेडसर महिलेला आज सकाळी अज्ञात व्यक्तीने मारहाण करून बलात्कार केल्याची तक्रार शिऊर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. यानंतर पोलिसांनी तपासादरम्यान पीडीत महिलेला धीर देऊन विचारपूस केली. तिने आरोपीबद्दल माहिती दिली. शिऊर पोलीसांनी दोन पथके तयार करून घटनास्थळ पिंजून काढले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
तपासात घटनास्थळी मिळालेल्या चपलीवरून आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतलं. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिऊर पोलीस करत आहेत.
Web Title: Cracked woman rape


















































