Home क्राईम या कारणामुळे गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल

या कारणामुळे गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल

Crime case against Gopichand Padalkar

सोलापूर | Crime: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर काल सोलापूरमध्ये दगडफेक झाली होती. दुसरीकडे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

सोलापुरात कोव्हीड १९ मुळे संचारबंदी असताना आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पडळकर यांच्यासह 10 ते 15 जणांवर सोलापूर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. घोंगडी बैठक आयोजित केली होती. या कार्यक्रमात गर्दी आढळून आल्याने आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्या तरुणाचा फोटो समोर आलाय. अमित सुरवसे असं या तरुणाचं नाव आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेसचाच कार्यकर्ता असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शरद पवार, रोहित पवार यांच्यासोबतचे फोटोही समोर येत आहेत. दरम्यान, अमित सुरवसेवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो अद्याप फरार असल्याचं सांगितलं जात आहे.

Web Title: Crime case has been registered against Gopichand Padalkar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here