संगमनेरातील घटना: बालिकेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी एकास सक्तमजुरी
संगमनेर | Crime News: ५ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ७० वर्षीय वृद्ध आरोपीस २ वर्ष ६ महिने सक्तमजुरी तसेच १ हजार रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली आहे. जिल्हा न्यायालय न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. कदम यांनी बुधवारी निकाल दिला आहे.
किसन गजाबा जाधव वय ७० रा, माळेवाडी शिबलापूर शिवार ता. संगमनेर असे या आरोपीचे नाव आहे.
७ मार्च २०१८ ला एका गावात ही घटना घडली होती. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात जाधव याच्या विरोधात एक व्यक्तीने फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने दोषारोपपत्र दाखल केले. यामध्ये एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. बालिकेची साक्ष महत्वपूर्ण ठरली. जिल्हा न्यायाधीश कदम यांनी या प्रकरणाचा निकाल देत आरोपी जाधव यास शिक्षा सुनावली.
Web Title: Crime News hard labor in a case of sexual abuse of a girl child