Home क्राईम पत्नीच्या प्रियकराकडून पतीच्या डोक्यावर कोयत्याने वार, प्रेमसंबंधातून वाद

पत्नीच्या प्रियकराकडून पतीच्या डोक्यावर कोयत्याने वार, प्रेमसंबंधातून वाद

Crime News:  प्रियकराने पतीच्या डोक्यावर कोयत्याने वार करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न. आरोपीस अटक.

Crime News Husband hit on head by wife's lover, Filed a case

पुणे | Pune: पत्नीशी प्रेमसंबंधातून वाद झाल्यानंतर प्रियकराने पतीच्या डोक्यावर कोयत्याने वार करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संगमवाडी येथे राहणाऱ्या एका ३२ वर्षांच्या तरुणाने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कानिफनाथ ऊर्फ कानक्या कोलार (वय ४०, रा. संगमवाडी) याला अटक केली. हा प्रकार संगमवाडी गावठाणातील गणेश मंदिरासमोरील रोडवर शनिवारी रात्री घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की,  फिर्यादी हे त्यांच्या पत्नीपासून मागील दोन वर्षांपासून वेगळे राहत आहेत. त्यांची पत्नी आणि कानिफनाथ कोलार यांच्यात प्रेमसंबंध असल्याने फिर्यादी आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. फिर्यादी हे शनिवारी रात्री रिक्षातून घरी जात होते. त्यावेळी कोलार याने रिक्षा थांबवून त्यांना शिवीगाळ केली. रिक्षातून खाली खेचून त्यांच्याजवळील कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्यावर व हातावर वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर तो पळून गेला. फिर्यादी यांना नवी सांगवीतील प्राइम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

पोलिसांनी कानिफनाथवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

Web Title: Crime News Husband hit on head by wife’s lover, Filed a case

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here