Home अहमदनगर शिवसेनेचे युवा पदाधिकारी यांना जीवे मारण्याची धमकी

शिवसेनेचे युवा पदाधिकारी यांना जीवे मारण्याची धमकी

Crime News Young office bearers of Shiv Sena threatened to kill

अहमदनगर |Crime| Ahmednagar: शिवसेनेचे युवा पदाधिकारी विक्रम राठोड यांना आगामी विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारीची तयारी करू नको, असा मजकूर असलेले निनावी पत्र मिळाले आहे. सदर पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. याबाबत राठोड यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. युवासेनेचे पदाधिकारी असलेल्या राठोड यांना धमकीचे पत्र मिळाल्याने शहर शिवसेनेत खळबळ उडाली आहे

अहमदनगर शहरातील चितळे रोडवरील शिवसेनेच्या कार्यालयात बुधवारी एक निनावी पत्र प्राप्त झाले. यामध्ये विक्रम राठोड यांना आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारीसाठी तयारी करू नको, असे म्हणत शिवीगाळ केल्याचा मजकूर आहे. सदर पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली. पत्र प्राप्त झाल्यानंतर राठोड यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्हा (Crime) दाखल केेला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी करीत आहे.

Web Title: Crime News Young office bearers of Shiv Sena threatened to kill

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here