Home संगमनेर संगमनेर बसस्थानकाजवळ तरुणाला मारहाण

संगमनेर बसस्थानकाजवळ तरुणाला मारहाण

Breaking News | Sangamner Crime: बसस्थानकाजवळ ‘हाच आहे म्हणून’ लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना.

Crime young man was beaten up near Sangamner bus stand

संगमनेर: एका तरुणाला सात ते आठ अनोळखी जणांनी संगमनेर बसस्थानकाजवळ ‘हाच आहे म्हणून’ लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बुधवार दि. २० मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की इम्रान रज्जाक सय्यद (वय ३६, हल्ली रा. कुरण रोड, संगमनेर) हा तरुण बसस्थानक परिसरात आला असता ‘हाच आहे म्हणून’ अनोळखी सात ते आठ जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी इम्रान सय्यद याने दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांत अनोळखी सात ते आठ जणांवर गुरनं. २५७/२०२४ भादंवि कलम १४३, १४७, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. टोपे करत आहेत.

Web Title: Crime young man was beaten up near Sangamner bus stand

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here