Home महाराष्ट्र महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृतदेह आढळला

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृतदेह आढळला

Breaking News | नदीपात्रात मृतदेह तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

Dead body of a college student was found

लातूर | निलंगा:  औराद शहाजानी (ता. निलंगा) येथील एक महाविद्यालयीन विद्यार्थिनी मागील चार दिवसांपूर्वी तेरणा नदीपात्रावर पुस्तक, कपडे व चप्पल ठेवून गायब होती. तिचा शोध घेतला असता मंगळवारी सकाळी नदीपात्रात मृतदेह तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत औराद पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

ममदापूर (ता. निलंगा) येथील मुलगी औराद येथील एका पॉलिटेक्निक महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत होती. ती दररोज ये-जा करत होती. दरम्यान, ती दि. ७ डिसेंबर रोजी सकाळी महाविद्यालयालगत असलेल्या तेरणा नदीच्या बॅरेजेसवर पुस्तक, बॅग, चप्पल ठेवून अचानक गायब झाली होती. वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांत नोंद करण्यात आली होती.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांची मदत घेत बंधाऱ्यात जाळे टाकले. मात्र, शोध लागला नाही. पाटबंधारे विभागाने सोमवारी बंधाऱ्यातील अतिरिक्त पाणी कर्नाटक राज्यात सोडून दिले. त्यामुळे अडकलेला मृतदेह हलला असावा. दरम्यान, मंगळवारी सकाळी त्या मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस प्रशासनाने नातेवाइकांच्या मदतीने पाण्यावर तरंगणाऱ्या मुलीचा मृतदेह बाहेर काढून औराद शहाजानी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेला आहे. याबाबत औराद शहाजानी पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरुन आकस्मिक मृत्यूची नोंद केल्याचे पोलिस उपनिरीक्षक जनार्दन काळे यांनी सांगितले.

पोलिसांनी संबंधित घटनेची चौकशी सुरू केली असून, औराद शहाजानी येथील अनेकांचे सीसीटीव्ही फुटेज, महाविद्यालयाचे सीसीटीव्ही पाहिले आहेत. महाविद्यालयानजीक तेरणा नदीपात्राजवळ घटनेशी संबंधित काही हाती लागतंय का? तिच्या मोबाइलवर आलेला शेवटचा कॉल कोणाचा होता?, शनिवारी केलेल्या प्रवासबाबातही अधिक चौकशी करण्यात येत आहे.

Web Title: Dead body of a college student was found

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here