Home अहमदनगर धरणाच्या पाण्यात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

धरणाच्या पाण्यात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Ahmednagar | Rahuri: बारागाव नांदूर येथील जांभळी धक्का हद्दीत पाण्यामध्ये तरंगताना अनोळखी इसमाचा मृतदेह (Dead body) आढळून आल्याने एकच खळबळ.

Dead body of unknown Isma was found in the water of the dam

राहुरी: तालुक्यातील बारागाव नांदूर येथील जांभळी धक्का हद्दीत पाण्यामध्ये तरंगताना अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाची ओळख न पटल्यानेघटनेबाबत घातपात की अपघात, अशीचर्चा सुरू झाली आहे.

वावस्थ जांभळीकरांसाठी होडीच्या थांब्याजवळ असलेल्या जांभळी धक्का या मुळा धरणाच्या पाण्यात शनिवार, ३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ च्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. यावेळी लगतच असलेल्या मच्छीमारी करणाऱ्यानी हा प्रकार जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांना सांगितला. संतोष शिंदे, जालिंदर माळी या पाणबुड्यांनी मृतदेह बाहेर काढला. दरम्यान, पोलीस हनुमंत आव्हाड यांनी मृतदेह ताब्यात घेतला व नगरच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठविला. मृतदेहावर मारहाण केल्याच्या खुणा व गळ्याभोवती काळे व्रण असल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

Web Title: Dead body of unknown Isma was found in the water of the dam

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here