Home क्राईम संतापजनक: धावत्या बसमध्ये महिलेसमोरच प्रवाशांचे घाणेरडे कृत्य

संतापजनक: धावत्या बसमध्ये महिलेसमोरच प्रवाशांचे घाणेरडे कृत्य

Pune Crime News:  प्रवाशानं महिलेसमोरच अश्लील चाळे (Molested) केल्याची घटना.

Dirty act of passengers in front of woman in running bus

पुणे: पुण्यात धावत्या पीएमपीएमएल बसमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे.  एका प्रवाशानं महिलेसमोरच अश्लील चाळे केल्याची घटना घडली आहे.  या प्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार केल्यानंतर संबंधिताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुण्यातील लोहगाव येथील संजय पार्क परिसरात ही संतापजनक घटना घडली. धावत्या पीएमपीएमएल  मध्ये एका प्रवासी महिलेचा अनोळखी व्यक्तीने विनयभंग केला. संशयित आरोपीने महिलेसमोरच अश्लील चाळे केले. हडपसर ते निगडी या दरम्यान प्रवास करणाऱ्या महिलेसोबत ही घृणास्पद घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  पुण्यातील लोहगाव येथील संजय पार्क परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी २७ वर्षीय महिलेने तक्रार दिली. त्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिला हडपसर ते निगडी या बसने प्रवास करत होती. बसमध्ये चालकाच्या डाव्या बाजूला असलेल्या सीटवर त्या बसलेल्या असतानाच अनोळखी व्यक्तीने तिच्यासमोर येत घाणेरडे चाळे केले. या प्रकरणी पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संबंधित संशयित आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Dirty act of passengers in front of woman in running bus

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here