Home क्राईम कामावर जाताना जबरदस्ती गाडीत ओढलं, बंदुकीच्या धाकाने विवाह अन् अत्याचार

कामावर जाताना जबरदस्ती गाडीत ओढलं, बंदुकीच्या धाकाने विवाह अन् अत्याचार

Breaking News | Pune Crime: तरुणीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना, कोयत्याच्या धाकाने तरुणीवर जबरदस्तीने बलात्कार.

dragged into a car while going to work, married at gunpoint and Rape

येरवडा: एकतर्फी प्रेमातून ओळखीच्या तरुणाने मित्राच्या मदतीने तरुणीचे खराडी परिसरातून अपहरण (Kidnap) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  त्यानंतर बंदुकीच्या धाकाने खोटे लग्न करून फोटो सोशल मीडियावर टाकले. कार नाशिकरोडला घेऊन गेल्यावर कोयत्याच्या धाकाने तरुणीवर जबरदस्तीने बलात्कार (Rape) केला. दुसऱ्या दिवशी तरुणीला तुळापूर रस्त्यावर सोडून आरोपी फरार झाले. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत २२ वर्षीय तरुणीने लोणीकंद पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी महेंद्र सीताराम वेताळ (भावडी रस्ता) आणि अमोल जाधव (रा. लोणीकंद) यांच्या विरोधात अपहरण, बलात्कार आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून वेताळ याला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  पीडित तरुणी वाघोलीत राहते. ती खराडीतील कंपनीत नोकरी करते. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे आठ वाजता घरातून कंपनीकडे निघाली. साडेआठ वाजता ती खराडीतील साईनाथनगरमध्ये उतरली. ती कंपनीकडे चालत जाताना रस्त्याच्या कडेला उभारलेल्या कारचा दरवाजा उघडला. तिचे तोंड दाबून जबरदस्तीने कारमध्ये बसविण्यात आले. कारमध्ये तरुणीचा ओळखीचा महेंद्र वेताळ दिसला.

तरुणीने आरडाओरडा करू नये, म्हणून वेताळ याने तिच्या गळ्यावर कोयता लावला. वाघोली बाजारजवळ तरुणीचा मोबाइल फेकून दिला. त्यानंतर भावडी रस्ता परिसरातील डोंगराळ भागात नेऊन बंदुकीच्या धाकाने वेताळ याने तरुणीच्या गळ्यात गुलाबाचे हार टाकून, गळ्यात मंगळसूत्र घालून आणि डोक्यात कुंकू टाकून दोघांचे फोटो मित्राच्या मोबाइलमध्ये काढून घेतले. त्यानंतर सर्व फोटो सोशल मीडियावर टाकले. रात्री आठच्या सुमारास नाशिकरोडजवळील डोंगराळ ठिकाणी नेऊन कोयत्याच्या धाकाने वेताळ याने तरुणीवर बलात्कार केला. रात्रभर तेथे थांबल्यावर आरोपींनी दुसऱ्या दिवशी सकाळी तरुणीला तुळापूर रस्त्यावर सोडून दिले.

पोलिसांनी दोघांच्या विरोधात अपहरण, बलात्कार आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आली असून एकास अटक करण्यात आली आहे.

Web Title: dragged into a car while going to work, married at gunpoint and Rape

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here